भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ हे घर अशी ओळख . सातत्याने गावठी पिस्तूल आढळून येणे , वर्षभरात खुना सारख्या गंभीर अपराधांचा वाढता आलेख , सिनेस्टाइल हत्त्या व अपराध . यामुळे शहरात भीतीचे वातावरण. पण उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी येथील गुन्हेगारीचा अभ्यास करून त्यावर अंकुश लावण्याचा उपाय सुरु केला आहे.
शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. भुसावळकरावर गुन्हेगारांची दहशत बसत होती. शिस्तप्रिय डीवायएसपी वाघचौरे साहेबानी अपराध्यांच्या कुंडलीच बनविल्या . उपद्रवी लोकांना हद्दपार करण्यासाठीचा बंदोबस्त केला. नामांकित लोक हद्दपार व्हायला सुरुवात झाली आणि शहरात शांतता नांदायला प्रारंभ झाला. अपराध्यावर कायद्याची जरब बसायला सुरुवात झाली. वाघचौरे यांच्या अगोदरही कर्तव्यदक्ष अनेक उपविभागीय अधिकारी आले . त्यांनी सुद्धा येथील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले .
पण वाघचौरे यांनी गुन्हेगारी मोडीत काढतांना सामान्य नागरिकांशी नाड जोडली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांशी सुरु केलेला संवाद. शहरातील अनेक तरुण शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने मोठी शहरे किंवा परदेशात आहेत. ज्येष्ठ नागरिक पती – पत्नी किंवा एकटेच राहत आहेत. अशा लोकांना धमकावण्याचा प्रकार होण्याची शक्यता असते. भुसावळात ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक आयोजित करून त्यात वाघचौरे यांनी मार्गदर्शन करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जर त्यांना त्रास होत असेल तर माहिती द्या साहाय्य केले जाईलच याची खात्री दिली. या शिवाय कोणी त्रास देत असेल तर तसेही सांगावे असे स्पष्ट केले. या प्रसांगी ज्येष्ठ नागरिकांना गहीवरून आले. डीवायएसपी साहेबानी त्यांचा मोबाईल क्रमांक ज्येष्ठ नागरिकांना दिला तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून घेत प्रत्यक्ष संवाद साधण्याची योजना राबविली. यामुळे ज्येष्ठ नागिरकांना मानसिक आधार मिळाला आहे. भुसावळ विभागात असा पहिलाच प्रयोग केला गेला आहे.
शहरातील अपराध्यांच्या माहिती मिळवून त्यांच्यावर कायद्यांचा धाक बसला पाहिजे यासाठी कठोर पाऊले ते उचलता आहेत. शहरात बाजारपेठ पोलीस ठाणे अत्यंत महत्वाचे आहे. सुमारे दिड गुंठा जागेवर हे पोलीस ठाणे आहे. वाढती गुन्हेगारी , शहराचा वाढता विस्तार यामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्याची अद्ययावत इमारत आवश्यक आहे . त्याअनुषंगाने मोठी जागा व इमारती साठी यशस्वी पाठपुरावा हि होता आल्याचे दिसते. पेट्रोलिंग योग्यव्हावि यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापरही त्यांनी करून घेतला आहे. एकंदरीत भुसावळ शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न डीवायएसपी वाघचौरे यांनी केले असल्याचे दिसते .