जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा जळगाव शहरातून जातो. तर शहराच्या बाहेर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच महाविद्यालय व काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. याठिकाणी नियमित विद्यार्थी, शिक्षक व कामगार ये-जा करीत असतात. तर बांभोरी गावापासून ते थेट पाळधी बायपास पर्यंत मुख्य महामार्गाच्या अगदीकडेला काही दुकानदारांनी दुकाने थाटल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे उदाहरण आज सायंकाळी 5 वा. समोर आले आहे.
शहरातून धुळेकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वरबांभोरी गावापासून ते पाळधी बायपासपर्यंत भरपूर हॉटेल्स्ची अवैध पार्किंग तसेच रस्त्याच्या कडेला काही दुकानदारांनी खेळण्याचे साहित्य तसेच विविध वस्तू विक्रीचे दुकाने थाटले आहेत. त्यामुळे जाणारे येणारे या दुकानातून वस्तू घेण्यासाठी गाडी थांवितात परंतु त्या गाडी मागून येणाऱ्या गाडीला जागा नसल्याने अपघात वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून नेहमी महामार्गावर अपघाताची मालिकाच सुरु राहते. परंतु याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे. जर सामान्य जनतेला प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
अपघात झाल्यावर फोटोसेशन
महामार्गावर अपघात होतोत यावेळी तेथील नागरिक मदत न करता बघ्याची भूमिका घेतात व फोटोसेशन करीत असतात. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करीत नसल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे.