जळगाव : प्रतिनिधी
अतिशय उपयुक माहिती असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या सन २०२१ सालच्या दिनदर्शिकेचे विमोचन काल रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात जळगाव येथील कोविड काळात आपले अमूल्य योगदान देणारे बँकेचेे ग्राहक डॉ.परीक्षित बावीस्कर,तिरुपति कडक्टरचे संचालक अतुल अग्रवाल,जोशी मेडीकल्सचे गोविंद जोशी,शीतल कलेक्शनचे मनोहर नाथानी,दालमिल व्यावसायिक पंकज बर्हाट, व सुवाद्य तुतारीवादक लक्ष्मण अंभोरे,शाहीर सखाराम जोशी यांंचे नातू शाहीर संग्राम जोशी, विवेकानंद शाळेतील शिक्षक व दिनदर्शिकेतील माहिती ज्यांंनी एकत्रित केली असे ज्ञानेश्वर पाटील सर व दिनदर्शिकेतील शूर मावळ्यांचे स्केच ज्यांंनी साकारले असे नितिन पाटील सर व मान्यवरांच्या हस्ते झाले.
या प्रसंंगी केशवस्मृती सेवा समुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर,बंँकेचे अध्यक्ष अनिल राव,उपाध्यक्षडॉ. प्रताप जाधव, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, केशवस्मृति प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील,बँंकेचे संचालक सतीश मदाने,सुरेश केसवाणी,तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुंंडलिक पाटील, कर्मचारी,अधिकारी व केशवस्मृती परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सभासदांसाठी विविध योजना राबवणार्या जळगाव जनता बँकेच्यावतीने सभासदांसाठी दरवर्षी अतिशय आकर्षक अशा दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येते.सन २०२१ च्या दिनदर्शीकेत बँकेने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने जिवाची पर्वा न करता लढा देणार्या शूर मावळ्यांची विस्तृत माहीती समाजाला व्हावी या अनुषंगाने माहिती विषद केली आहे. त्यात बहिर्जी नाईक,प्रतापराव गुजर,कोंडाजी फर्जद,कान्होजी जेधे,मुररबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा,बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार, बाजी पासलकर,जीवा महाला, हिरोजी इंदलकर यासारख्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाची माहिती दिनदर्शिकेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचप्रमाणे दिनदर्शिकेत सर्व शाखांचे फोन नंबर तसेच कार्यालयीन वेळेची,माहिती,तिथी,वार,नक्षत्र इ.ची माहिती तसेच केशवस्मृती समुहातील विविध प्रकल्पांची माहिती तसेच प्रकल्पप्रमुख,प्रकल्प सहप्रमुख व व्यवस्थापक व त्यांचे संंपर्क क्रमांक देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी केले तर उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव यांनी शिवरायांचे मावळे व त्यांचा महिमा विषद केला.आभार प्रदर्शन संचालक अधिकारी अतुल नाईक यांनी केले.सूत्रसंचालन अधिकारी स्वाती भावसार यांनी केलेे.दिनदर्शिकेचे वितरण ३१ डिसेबरपासून होणार असून सभासदांना बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होणार आहेत असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.