Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»१५ हजारांच्या चप्पलांची गोणी लंपास करणारे तिघे अटकेत
    जळगाव

    १५ हजारांच्या चप्पलांची गोणी लंपास करणारे तिघे अटकेत

    saimat teamBy saimat teamSeptember 30, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    १५ हजारांच्या चप्पलांची गोणी लंपास करणारे तिघे अटकेत
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । चप्पल विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या १५ हजार रूपये किंमतीच्या गोणीभर चप्पल, सॅंडल लंपास केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती, याप्रकरणी शहर पोलिसांनी त्या चोरट्यांना २९ रोजी सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे.

    जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जुबेर युसूफ शेख (वय २७) हा फुले मार्केट परिसरात हातगाडीवर चप्पल, सॅंडल विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवार २८ रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन, फुले मार्केट गेट जवळ दुकान लावले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने सर्व माल ६ गोणीत भरून त्याने समोर असलेल्या दु.क्र.१२८ च्या बाहेर ठेवून घरी निघून गेलो. दुकान मालक अजय चौधरी यांना सांगून जुबेर घरी गेला आणि सायंकाळी ५ वाजता परत आला. दुकानाबाहेर ठेवलेल्या गोण्या पहिल्या असता ६ पैकी एक गोणी दिसून आली नाही. गोणी चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी १५ हजार २१२ रुपयांच्या चप्पल चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांनी तपास केला असता घटनेच्या दिवशी किशोर बाविस्कर हा एक गोणी घेऊन जात असताना त्याला काही नागरिकांनी हटकले असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांच्या वर्णनावरून शोध घेतला असता महेश राजेंद्र तायडे (वय २१, रा. वाल्मिक नगर), शोएब शेख अख्तर (वय ३३, रा.रथ चौक), किशोर जानकीराम बाविस्कर (वय ३१, रा.वाल्मिक नगर) यांची नावे निष्पन्न झाली. पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ, संतोष खवले, योगेश इंधाटे, उमेश भांडारकर यांच्या पथकाने महेश तायडे याच्या घरी चौकशी केली असता त्याने घराच्या माळोच्यावर काहीतरी गोणी फेकल्याचे समजले. पोलिसांनी तपासणी केली असता चोरलेला मुद्देमाल मिळून आला. परिसरात तिघे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास किशोर निकुंभ करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.