आजच्या मनपा स्थायी सभेत सदस्यांनी चर्चेत प्रत्यक्ष घेतला सहभाग

0
65

जळगाव : प्रतिनिधी
शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज मनपाच्या सरदार वल्लभभाई पटेल प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात झाली. गेल्या सात महिन्यानंतर या सभेला स्थायी समिती सदस्यांना प्रत्यक्ष हजर रहाता आले. यापुर्वी त्यांना ऑनलाईन सभेत सहभागी व्हावे लागत होते. त्यामुळे आजच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत १४ प्रशासकीय प्रस्तावांवर चर्चा होवून निर्णय घेण्यात आले. त्या प्रामुख्याने काही प्रभागातील रस्ता दुरुस्ती, शहरातील काही मनपा मालकीच्या खुल्या जागेस चेनलीक फेन्सींग करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे, वाघुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहीनी पाईपलाईन व वार्षीक व्यवस्था व दुरुस्ती करणे, नागरी दलितेत्तर वस्त्यात सुधारणा योजना अंतर्गत मेहरुण परिसरातील साईबाबा मंदिरामागील नाल्यास मिल्लत हायस्कुलपर्यंत संरक्षण भिंत उभारणे, घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी प्रतिदीन २५० कामगार पुरविणे याशिवाय दैनंदीन रस्ते व गटार साफसफाईसाठी प्रतिदीन ४०० कामगार नियुक्ती करण्याच्या मनपा प्रस्तावावर या सभेत निर्णय घेण्यात आले. सभेत स्थायी समिती सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून प्रस्तावावर आपली मते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here