Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल नगरपरिषद अतिरिक्त साठवण तलावात पावणेदोन कोटीचा भ्रष्टाचार
    यावल

    यावल नगरपरिषद अतिरिक्त साठवण तलावात पावणेदोन कोटीचा भ्रष्टाचार

    saimat teamBy saimat teamSeptember 29, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    यावल नगरपरिषद अतिरिक्त साठवण तलावात पावणेदोन कोटीचा भ्रष्टाचार
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेतर्फे ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यापूर्वी अतिरिक्त साठवण तलावाचे जे बांधकाम केले त्या कामात सुमारे1कोटी80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार,गैरप्रकार झाल्याबाबतची तक्रार यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि इतर काही नगरसेवकांनी केल्याने यावल नगरपालिकेतील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

    जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.27सप्टेंबर2021 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात यावल नगरपरिषद अध्यक्षा सौ.नोशाद तडवी,नगरसेवक मनोहर बाबुराव सोनवणे,सैय्यद युनूस सैय्यद युसुब,नगरसेविका रजीयाबी गुलाम रसूल,शेख सईदाबी हारून,खान शमशाद बेगम महंमद खान यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की नवीन साठवण तलाव यावल हा एकूण तांत्रिक मंजुरी रक्कम3कोटी51लाख56 हजार रुपयाचा मंजूर होऊन निविदा रक्कम2कोटी84लाख38हजार 516 असून सदर कामात सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे नियोजन करत सुमारे1कोटी80 लाख रूपये एवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे खालील प्रमाणे चौकशी करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.

    यावल नगरपरिषद तत्कालीन आणि नुकताच लाचखोरीचा गुन्हा दाखल असलेले मुख्याधिकारी बबन तडवी अपहारात सामील असल्यामुळे कायमस्वरूपी नोकरीतून काढावे आणि गुन्हा दाखल व्हावा वसुली करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान भरणा करावा.इंजिनीयर यांचे खोटी व अतिरिक्त मापे तपासावीत अतिरिक्त पेमेंटला जबाबदार धरून पैसे रिकव्हर करावी.गुन्हेगार म्हणून खटला चालवावा व निलंबित करावे, खोटे लिहिलेले मापे संपूर्ण तपासावेत.ठेकेदाराने बोगस काम,खोटी मापे,सदोष तलाव बंधने नपाचे नुकसानीस जबाबदार संगतमताने न.पा. पैशांचे लूट कायमस्वरूपी ब्लॅक लिस्ट होऊन गुन्हा दाखल व्हावा. कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन कॅन्सल व्हावे.सामील गुन्हेगार यांच्यावर कार्यवाही व्हावी एफआयआर व्हावी,अपहार रकमेची वसुली व्हावी व कायमस्वरूपी गुन्हेगार म्हणून दोषारोप म्हणून सजा व्हावी. वरील सर्वांची पोलिस विभाग यांचेकडून चौकशी व्हावी गुन्हे नोंदवून सजा व्हावी.सदर चौकशी ही अर्जदार यांचे समक्ष होऊन चौकशीचा विभाग वार लेखी रिपोर्ट मिळावा. ही तक्रार व जी चौकशी सर्वसामान्य तक्रार नसून यात निश्चितच मोठा आर्थिक अपहार झालेला आहे

    कृपया न.पा.चे मोठे आर्थिक नुकसान झालेले पैसे परत न.पा. फंडात यावेत गुन्हेगारांना सजा व्हावी हा हेतू आहे.सदर साठवण तलावाची योग्य त्या कार्यालयामार्फत व अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बिल व अनामत रक्कम अदा करण्यात येऊ नये.खोदकामे, मापे चुकीची आहेत अंदाज पत्रक प्रमाणेच कॉपी केलेली आहेत. परंतु प्रत्यक्ष जागेवर3मीटर पर्यंतचे खोदलेले आहे.जेव्हा की खोली8मी.व भराव धरून11मी. तलावाची एकूण खोली पाहिजे होती. डिझाईन नुसार स्लोप व टॉप विथ नहीं माती कामाची खोटे मापे सारखी कशी येऊ शकतात, भराव कसा राहील,मापेmbमध्ये तपसावित प्रत्यक्ष केलेली मापांशी तुलना करावी,जलसंपदा विभाग यांनी दिलेल्या क्रॉस सेक्शन व mpwमॅन्युअल नुसार काम केलेले नाही.मापे दाखविली परंतु काम केलेले नाही डायरेक्ट पेमेंट काढून घेतलेले आहे.DRAINGE ARRANGEMENT(तळातील)केलेली नाही, डिझाईन प्रमाणे नाही त्यामुळे तलाव केव्हाही फुटू शकतो पाटबंधारे विभागाने दिलेली डिझाईन नुसार केलेली नाही फक्त पेमेंट काढून घेतले आहे.

    थर्ड पार्टी चेकिंग करणारे जागेवर आलेले नाहीत.व मटेरियल न चेक करतात खोटे दाखले दिलेले आहेत.भराव कॉम्पेशेषन नाही. केसिंग मटेरियल टाकलेलेच नाही. तरी पण चेकिंग दाखविलेली आहे. थर्ड पार्टीने खोटे दाखले दिले त्यामुळे थर्ड पार्टी देखील दोषी आहे व कार्यवाहीस पात्र आहेत त्यांना देखील निलंबित करावे व कार्यवाही होऊन वसुली करावी इत्यादी एकूण16गंभीर स्वरूपाच्या मागणी यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे तसेच यावल नगरपरिषद आगामी पंचवार्षिक निवडणूकिमुळे यावल शहरातील संपूर्ण राजकारणात नगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yavala : जिनिंग प्रेस व्यापारी संकुलना समोरील रस्त्याची दुरावस्था

    December 24, 2025

    Yavala : बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

    December 24, 2025

    Yāvala : सांगवी बु. येथे जनजागृती शिबिर

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.