जळगावात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक

0
62
मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी ६ फुटाची गणेशमूर्ती आढळली

जळगाव प्रतिनिधी । शहरात २४ वर्षीय तरुणाने तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर कॉलनी येथील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या सागर पुनम कंडारे (वय-२४) अश्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कंडारे हा शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात हातात ३० इंच लांबीची लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस नाईक सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इमरान शेख यांनी रामेश्वर कॉलनीत रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना संशयित आरोपी सागर कंडारे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून ३० इंच लांबीची लोखंडी तलवार हस्तगत केली आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान बेग यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात संशयित आरोपी सागर कंडारे याच्याविरोधात रात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here