साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल
संपूर्ण जगात ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त यावर्षीही यावल येथील आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयातर्फे कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कार्यक्रम शुक्रवारी, ९ ऑगस्ट २०२४ रोजी यावल येथे सकाळी १० वाजता एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प कार्यालय, यावल सार्वजनिक बांधकाम उपविभाग आवारात शासकीय कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हाधिकारी जळगाव, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते, आदिवासी सेवक, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासह पंचक्रोशीतील अंदाजे ४ ते ५ हजार आदिवासी बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. जागतिक शासकीय आदिवासी दिन उत्सव कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उत्सव कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केले आहे.