चाळीसगाव, प्रतिनिधी । विजेचे बिल कमी करण्यासाठी महिलेकडे 5 हजार रुपयांची मागणी वायरमन ने केली असून अशी आपबीती महिलेने पत्रकाराकडे केली असून अशा वायरमन वर कारवाई ची मागणी केली आहे.
शहरातील हिरापुर रोडवर गणेश मंगल कार्यालयाजवळ पिठाची गिरणी असून या गिरणी चालक महिलेला 10400 रुपयांचे वीज बिल आले एवढे बिल कसे आले याची विचारणा त्यांनी वायरमन भालचंद्र वाघ व अधिकारी यांच्याकडे केली असता तुम्ही वीजचोरी केली म्हणून आपणास 8500 रुपये दंड आला असल्याचे सांगण्यात आले बिल न भरल्यास मीटर कट केला जाईल आणि यातून मार्ग काढायचा असेल तर मला 5000 रुपये द्या असे वायरमन ने त्या महिलेला सांगितले असता मी विज चोरी केली नाही तर बिल कसे भरू असे या महिलेने सांगितले शिवाय पैशांची मागणी करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी व ही बातमी पेपरमध्ये लावा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.



