चोपडा येथे काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको

0
40
चोपडा येथे काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको

चोपडा, प्रतिनिधी । चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे 27 सप्टेंबर 2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडाच्या दक्षिण गेट जवळील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे भारत बंदला या आंदोलनाद्वारे पाठिंबा देण्यात आला.

या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेस पक्षातर्फे, जनतेचे आभार मानण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या तीन काळे कृषी कायदे त्वरित रद्द करावे, कामगार विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोदी सरकार विरुद्ध घोषणा देत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजाबराव पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी. चौधरी, प्रा. प्रदीप पाटील, महेंद्र चौधरी, प्रा. कांतीलाल सनेर, देविदास साळुंखे, देवानंद शिंदे, रमाकांत सोनवणे, देवकांत चौधरी, चेतन बाविस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्राध्यापक शैलेश वाघ, प्राध्यापक संदीप पाटील, मुक्तार सय्यद, अशोक साळुंके, सोहन सोनवणे, प्रा. प्रमोद पाटील, जितेंद्र चौधरी, गोपीचंद चौधरी, आरिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here