मलकापूर प्रतिनिधी सतीश दांडगे
मोबाईल फोन मधील फोटो आणि इतर सामग्री नेस्तनाबूत करण्यामागचा पोलिसांचा हेतू काय!
दैनिक देशोन्नती चे पत्रकार समाधान भाऊ गाडेकर आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी त्यांना फोटो काढण्यापासून मज्जाव करीत लोटपोट करून मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपरोक्त पोलिसांवर कारवाई करून त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात यावे या मागणीच्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले.
सविस्तर असे की,१४ सप्टेंबर च्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा व स्थानिक चिखली पोलीसांनी चिखली खामगाव रोडवरील हाॅटेल अमृतत्युल्य जवळ एका ट्रकमधून प्रवासी वाहतुक करीत असलेल्या लोकांकडुन जवळपास ८८ कीलो गांजा पकडल्याची माहिती मिळताच पत्रकार समाधान गाडेकर हे वृत्त संकलनासाठी गेले असता तेथे उपस्थित पीएसआय निलेश शेळके व दिपक वायाळ यांनी वृत्तांकनासाठी घेत असलेले फोटो काढण्यास मज्जाव करत पीएसआय शेळके यांच्या आदेशाने तेथे उपस्थित कर्मचार्यांनी पत्रकार गाडेकर यांना अरेरावी करत दोन्ही बाजूने धरुन ठेवले या बाबतचा विरोध गाडेकर यांनी दर्शविला असता कर्मचार्याने त्यांना मारहाण केली. तेव्हा लगेच पीएसआय शेळके यांनी गाडेकर यांच्या हातातले मोबाईल हिसकावून घेऊन काढलेले सर्व फोटो डीलीट केले. तसेच त्यांना परत लोटपाट करुन अपमानीत केले, एव्हढी मोठी कारवाई होत असतांना या बाबत पत्रकारांनी केलेल्या बातम्यांमुळे नक्कीच पोलीसांचे कौतुकच झाले असते परंतु पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत वृत्तांकन करण्यासाठी मज्जाव का केला जातो हेच सजण्या पलिकडे, असल्या प्रकरणामुळे पत्रकार समाधान गाडेकर सह समस्त पत्रकार बांधवांचाच अपमान त्यांनी केल्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अन्यथा असे न झाल्यास येत्या 8 दिवसांमध्ये तिव्र स्वरूपाचे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षातर्फे छेडण्यात येईल व होणारे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील
यावेळी धनश्री ताई काटीकर पाटील जिल्हाध्यक्ष रासप भरत भाऊ जोगदंड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रासप विठ्ठल भाऊ परिहार तालुकाध्यक्ष रासप गणेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष सखा चोरमारे तालुका उपाध्यक्ष रासप यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.