जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात मुद्रांकशुल्क सवलत ३१ डिसेंबरपर्यंत मिळत असल्याने नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी एकच गर्दी केली आहे. प्रत्यक्षात ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत असली तरी त्या तारखेच्या आत मुद्रांक शुल्क अदा केले तर असे दस्तऐवज नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यापर्यंत केव्हाही दस्तनोंदणीस दाखल करता येतात.
ही बाब जनतेने लक्षात घ्यावी व कार्यालयात गर्दी करु नये असे आवाहन सुनिल मधुकर पाटील सहजिल्हा निबंधक वर्ग २ जळगाव यांनी पत्रकाव्दारे केले आहे.