मुक्ताईनगर ः अमोल वैद्य
शहरामध्ये लॉकडॉऊनच्या काळापासून ते आजतागायत पोलीस व राज्य उत्पादन शुल्काच्या ‘अर्थ’पूर्ण संंबंधातून अवैध दारू विक्रीची दुकाने ठिकठिकाणी सर्रासपणे सुरू आहेत. इतकेच नव्हे तर सट्टा-मटका या अवैध धंद्यांना ऊत आला आहे.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर तसेच भुसावळ रोडवर उघडपणे अवैध मद्यविक्री होत असते.थातूरमातूर कारवाई करून बड्या माश्यांना सोडले जाते तर तेथील नोकरांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा प्रकारचे ‘अर्थ’पूर्ण समायोजन अवैद्य धंदेवाल्यांसह कारवाई करणार्या पोलीस तसेच उत्पादन शुल्क पथक यांंच्यामध्ये असल्याने केवळ वरच्यावर कारवाई करण्यात येते. ही कारवाई केवळ केसेस वाढवण्यासाठी तसेच संबंधित विभाग आपले कर्तव्य सतत व इमानदारीने पार पाडत आहेत याचा दिखावा करण्यासाठीच केल्या जात असल्याचाही चर्चा आह.
आशा कारवायांमुळे मात्र अवैध धंद्यांना आळा बसण्यापेक्षा सदरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत.यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये वृत्त येऊनही मोठ्या माशांंना सोडून अथवा चुकून एखादी मोठी कारवाई झाल्यावर सुद्धा त्या कारवाईत बनावट दारू मोठ्या प्रमाणात हस्तगत होऊन सुद्धा अतिशय कमी प्रमाणात सदरची दारू फिर्यादीमध्येे नोंदवली जात असल्याने संबंधित प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तालुक्यातील अवैध धंंद्यांची खडा न् खडा माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला असतांना देखील जिल्ह्यावरील पथक येऊन मुक्ताईनगर तालुक्यात कारवाई करून जाते तर स्थानिक पोलीस प्रशासन नेमके करते काय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर म्हणजेच मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. या ठिकाणावर मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गुटका व बनावट दारू महाराष्ट्रात म्हणजेच मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आयात केले जाते.असे असताना पोलिस प्रशासनातील मोठे अधिकारी महाराष्ट्र राज्य गुटकामुक्त करण्याचा संकल्प करतात परंंतु मुक्ताईनगर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होऊन त्याची विक्रीही सर्रासपणे होतांंना दिसते आहे.इतकेच नव्हे तर यापूर्वी जो गुटका पोलीस प्रशासनातर्फे अथवा स्थानिक गुन्हे शाखा पथकातर्फे जप्त करण्यात आलेला आहे त्या जप्त केलेल्या गुटख्याचे नेमके शेवटी काय होते,तो जातो कुठे, त्याची विल्हेवाट लागते काय असा प्रश्न उपस्थित होत असून सदरचा जप्त केलेला गुटखा पुन्हा बड्या व्यापार्यांकडे परत केला जात असून त्यावर पोलिस अधिकार्यांंचे ते हप्ते वाढून घेतले जात असल्याचीही चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना शेजारच्या राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशात मात्र गुटखाबंदी नाही त्यामुळे महाराष्ट्रात जर गुटख्याची बंदी आहे म्हणजेच महाराष्ट्रात गुटका निर्मिती होत नाही तर मग नेमका महाराष्ट्रात गुटका येतो कुठून, सदरचा गुटका जर शेजारच्या राज्यातून येत असेल तर त्या सीमावर्ती भागात तपासणी करण्यात येत नाही काय असा सवालही उपस्थित केला जात आहे इतकेच काय तर शासकीय कर्मचारी व पोलिस प्रशासनातील कर्मचारी अधिकारी सुद्धा गुटख्याचे व्यसन सर्रासपणे करताना दिसून येतात परंतु त्याकडे सुद्धा वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करताना दिसून येते त्यामुळे शासकीय कार्यालयातील भिंती या लाल झालेल्या दिसून येतात.
वृत्तपत्रांमध्ये बातमी आल्यानंतर नाईलाजाने प्रशासन थातुरमातुर कारवाई करण्याचे सोंग घेऊन आता हप्ता वाढवावा लागेल, नाहीतर डबल तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशीसुद्धा नागरिकांंमध्ये चर्चा सुरु आहे
मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सर्रासपणे जुगार सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळला जातो यातून लाखोची उलाढाल होत असते यामध्ये नुकताच जुगारच नव्हे तर मद्य दारू प्राशन करून जुगार खेळले जात असते या ठिकाणी क्लब चालक दारूची डबल भावाने विक्री करीत असतात.जुगाराच्या क्लबवर क्लास चालक जुगारच्या गावातून नाल ही मोठ्या प्रमाणात काढतातच त्याबरोबर दारूचाही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. दारूच्या नशेमध्ये जुगार खेळणार्याला काही समजत नाही याचा फायदा क्लब चालक मोठ्या प्रमाणात घेत असतो असे समजते. त्या ठिकाणी छोटा मोठा वाद होत असतो. अशा हाणामारीच्या घटना अलीकडे घडलेल्या आहेत परंंतु पुन्हा ते क्लब नव्याने बस्तान मांंडून आहेत.याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक, एलसीबीचे मुख्य अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी लक्ष द्यायची जास्त गरज आहे.याकडे लक्ष देणार का आणि कारवाई करणार का,असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.