यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद अंतर्गत नवीन वस्तीत केलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात आलेले आहे या कामाच्या मंजुरी आदेशानुसार आपल्या स्तरावरून केलेल्या सदर कामाचे इस्टिमेट,एम.बी.रेकॉर्ड व ठेकेदाराला अदा केलेले बिल याचे प्रमाणित प्रती तसेच सदरच्या कामाबाबतचे संपूर्ण कागदपत्राची संचिका अवलोकनार्थ यावल तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावे असे लेखी पत्र यावल तहसीलदार यांनी दि.14/9/ 2021रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे. परंतु संबंधित माहिती अधिकारी बडे यांनी यावल तहसीलदार यांचे पत्रास कचराकुंडी दाखवित तहसीलदारांना माहिती देणे संदर्भात कर्तव्यात कसूर करून शिस्तभंग करीत असल्याने आणि इतर कारणांनी सुद्धा यावल नगरपरिषद राज्य जन माहिती अधिकारी बडे यांच्याविरुद्ध लवकरच लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
दि.28मे2021रोजी यावल शहरातील राजेश कडू महाजन यांनी फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जानुसार उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दि.19/7/2021रोजी यावल तहसीलदार यांना लेखी आदेश देऊन यावल नगरपरिषद हद्दीतील विकासक व लेआउट धारक यांनी कोणतीही सुविधा न देता भूखंड विकसित केले बाबतच्या विषयान्वये चौकशी करून विस्तृत अहवाल पुराव्यासह या कार्यालयात सात दिवसाच्या आत सादर करण्यात यावा असे कळविले होते आणि आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये यावल तहसीलदार यांनी दि.14/9/ 2021रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन सदरील कामाबाबतचे संपूर्ण कागदपत्रांची संचिका अवलोकनार्थ इकडील कार्यालयात तात्काळ सादर करण्याचे कळविले होते आणि आहे. परंतु यावल नगर परिषद कार्यालयातील जन माहिती अधिकारी बडे यांनी अध्याप पावतो यावल तहसीलदार यांना कामाची कागदपत्राची संचिका सादर केलेली नाही.तहसीलदार यांनी वेळोवेळी बडे यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला परंतु बडे यावल तहसीलदार यांच्या सूचनेकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत,शिस्तभंग करून कर्तव्यात कसूर करीत आहेत.
जन माहिती अधिकारी बडे यांच्याकडे अनेक माहितीचे अर्ज प्रलंबित असून आलेल्या माहिती अर्जावर माहिती मागणाऱ्या अर्जदारास मुदतीत कोणत्याही प्रकारे लेखी पत्र व्यवहार केला जात नाही तसेच मुदतीच्या आत प्रथम अपील अर्जाची सुनावणीची प्रक्रिया सुद्धा पार पाडली जात नाही.आलेल्या माहिती अर्जानुसार जन माहिती अधिकारी मुदतीत माहिती देत नसल्याकारणाने अर्जदार यावल नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलिय अधिकारी यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा नुसार प्रथम अपील दाखल करतात ते प्रथम अपील दाखल केल्यानंतर सुद्धा जन माहिती अधिकारी बडे हे प्रथम अपील सुनावणी मुदतीत घेण्याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे जाणून बुजून प्रथम अपील सादर करीत नाहीत,तसेच माहितीचा अधिकार कायदा सन 2005 मधील अटी व शर्तीचा भंग करून माहिती साठी लागणारा खर्च वाजवीपेक्षा,नियमापेक्षा जास्त आकारणी करीत आहेत.याकडे यावल नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जन माहिती अधिकारी बडे यांच्याविरुद्ध शिस्तभंग आणि कर्तव्यात कसूर केला जात असल्याच्या कारणावरून पुढील योग्य ती कार्यवाही भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा संघटक तथा पत्रकार सुरेश पाटील हे लवकर करणार आहेत.