जळगाव, प्रतिनिधी । सेवा समर्पण अभिमान अंतर्गत मा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या १७ सप्टेंबर वाढदिवसा पासून तर २ ऑक्टोबर पर्यंत सेवा समर्पण अभियान भाजपतर्फे राबविण्यात येत असुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, गरीबजन कल्याणकारी, अंतर्गत अन्न वाटप, युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, केंद्र सरकारचे जन कल्याण कारी योजना ची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविने आदी अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मुख्य कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता भा ज पा कार्यालय वसंत स्मृति येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपन जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आ सुरेश भोळे (राजुमामा) व जिल्हाध्यक्ष (महानगर) दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच भाजप महानगर तिल ९ मंडलात व ३९२ बुधवर प्रतिमा पुजन व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असुन या कार्यक्रमासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी आपल्या मंडळात व बूथ स्तरावर राबविण्यात येणार्या कार्यक्रमांत उपस्थितीत रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन कार्य व पक्ष विचार”* या विषयावर वर्च्युअल व्याख्यान पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री उदयजी भालेराव हे संध्याकाळी सात वाजता मार्गदर्श करणार आहेत. सदरिल कार्यक्रमांसाठी उपस्थितीचे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी डॉ राधेश्याम चौधरी,महेश जोशी,नितीन इंगळे विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, संपर्क अ प्रमुख राहुल वाघ, सहप्रमुख महेश चौधरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भंडारकर, धिरज वर्मा उपस्थितीचे आवाहन केले
