जळगाव ः प्रतिनिधी
शेतकरी बंधु व भगिनींना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार असून आज रोजी या योजने अंतर्गत जळगाव जनता सहकारी बँकेच्या १९९२ खातेदारांच्या खात्यात दिनांक २५.१२.२०२० रोजी रु ३९.८४लाख इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे असे जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जळगाव जनता सहकारी बँक नेहमीच आपल्या खातेदारांना तत्पर व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यास कटिबद्ध असते.बँकेमार्फत तत्परतेने जमा करण्यात आलेल्या या रकमेचा लाभ बँकेच्या खातेदारांना घेता येणार आहे. तसेच या व अशा सर्व शेतकरी बंधूंना आपले कृषी उत्पन्न बाजारपेठेत नेण्यासाठी आवश्यक ते सर्व वित्त सहाय्य जनता बँक करणार आहे असा संकल्प व्यक्त केला.