जळगाव मनपा व मराठी प्रतिष्ठान साकारणार ‘हिरवाई’ प्रकल्प

0
8
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरवाई’ या प्रकल्पांतर्गत मेहरुण तलाव परिसरात 1001 झाडे लावली जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ शुक्रवार, दि.24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजता महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, मराठी प्रतिष्ठानचे प्रवर्तक श्री.विजयकुमार वाणी व मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवराई प्रकल्पप्रमुख व हिंदी, मराठी, कन्नड व तमीळ चित्रपटांत भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते श्री.सयाजी शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी सर्व नगरसेवक, नगरसेविका व मराठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारीही उपस्थितीत राहतील.

जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्यात ‘हिरवाई’ प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनासंदर्भात करारही झालेला आहे. या प्रकल्पामुळे जळगाव शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितपणे भर पडणार आहे. त्या अंतर्गत करंज, कडुनिंब, वड, पिंपळ, आवळा, चिंच, अमलतास, बहावा, कदंब आदी विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे. या 1001 झाडांसाठी संपूर्णपणे खड्डे खोदून रोपट्याला काटेरी कुंपण टाकण्याचे कामही नियोजनपूर्वक सुरू झालेले आहे. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या या अभिनव प्रकल्पाच्या प्रारंभावेळी जळगावकर वृक्षप्रेमींनी मेहरुण तलावाकाठच्या चौपाटीवर आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, ‘मराठी प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने साकारला जाणारा हा सहावा प्रकल्प आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here