इच्छादेवी चौक परिसरातील राेडवरील अतिक्रमण बांधकामांना आजची मुदत

0
52
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २० किलाेमीटर अंतराचे प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गावरील अतिक्रमण हटाव माेहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. कानळदा राेडवरील अतिक्रमण काढल्यानंतर इच्छादेवी ते शिरसाेली नाक्यादरम्यान अभियान राबवण्यात अाले. अनेक वर्षापासून पक्के अतिक्रमण असलेल्या रहिवाशांना बुधवारी सकाळी ११ वाजेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा जेसीबीने सरसकट ताेडण्याचा इशारा देण्यात आला.

गेल्या महिनाभरापासून शहरातून जाणाऱ्या २० किमी लांबीचा प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग असलेल्या सहा रस्त्यांच्या विकासावर अधिक भर दिला जात आहे. या रस्त्यांची कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाणार आहे. तत्पूर्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असल्याने दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुचवल्याप्रमाणे या सर्व मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई मंगळवारी सकाळी महापालिकेचे उपायुक्त संताेष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली.

गटारीपासून सात फूट आतपर्यंत
मनपाने रस्त्याची माेजणी करून मार्किंग केली आहे. त्यानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकांनी प्रत्येक अतिक्रमण धारकाच्या जागेसमाेर जाऊन व्हिडिओ चित्रणात सूचना दिल्या. यात गटारीपासून सात फुटापर्यंत आतमध्ये अतिक्रमण काढावे लागणार आहे. यात अनेकांची दुकाने असल्याने साहित्य काढून नुकसान टाळण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी १५ ते २० ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आली.

निमुळता रस्त्यामुळे येते अडचण
इच्छादेवी ते शिरसाेली नाक्यादरम्यान एकाच रस्त्याची लांबी वेगवेगळी नाेंदवली गेली अाहे. विकास अाराखड्यावर या रस्त्यापैकी निम्मा रस्ता हा ३० मीटरचा अाहे तर उर्वरित रस्ता १८ मीटरचा अाहे. सध्या या रस्त्यावर दाेन्ही बाजूने अतिक्रमण असल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी वापरात येताे. अतिक्रमण काढल्यानंतर सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी वाट माेकळी हाेणार अाहे.

कानळदा फाट्यापर्यंत अतिक्रमण
शिवाजीनगरातील अंबिका साॅ मिल ते कानळदा फाटा हा रस्तादेखील सहा रस्त्यांमध्ये समाविष्ट अाहे. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीही पीडब्ल्यूडी मार्फत केली जाणार अाहे. या रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकाने अाठ ते दहा ठिकाणी कारवाई केली. काही नागरिकांनी स्वत: काढून घेण्याची परवानगी घेतली. त्यामुळे हा रस्ता अाता दुरुस्तीसाठी अाता माेकळा हाेणार अाहे. शिवाजीनगरातील अंबिका साॅ मिल ते कानळदा फाटा रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबीने काढताना मनपाचे पथक.

अतिक्रमणानंतर लागलीच रस्ते दुरुस्ती करणार
गेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांसह बांधकाम विभागाने रस्त्यांवरील अतिक्रमणांवर जाेर दिला हाेता. त्यामुळे महापालिकेच्या दृष्टीने सर्व सहा रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे हेच प्रमुख लक्ष्य अाहे.अनेक वर्षांपासून दाटीवाटीने वाहतूक सुरू असलेल्या इच्छादेवीराेडवर बऱ्याच वर्षांनंतर कारवाई हाेणार अाहे. त्यामुळे शहराचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या रस्त्यावर शिरसाेली नाका परिसर माेकळा श्वास घेईल.वाहनधारकांना सतत अपघाताची असणारी भीती टळणार अाहे.

सहा रस्त्यांवर मनपाचे जेसीबी वर्दळ अाणि वादग्रस्त भागावर विशेष लक्ष
इच्छादेवी ते शिरसाेली नाका या महामार्गावर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले अाहे. प्रचंड वर्दळ व संवेदनशील भाग असलेल्या या मार्गावरील अतिक्रमण कारवाईसाठी मनपाचे पथक पूर्ण तयारीने गेले हाेते. साेबतीला जेसीबी असल्याने अतिक्रमण तुटणार हे निश्चित झाल्याने नागरिकांनी एक दिवसाची मुदत मागून घेतली. त्यामुळे पक्के अतिक्रमण असल्याने बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिला अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here