वाघूर धरण परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

0
64
वाघूर धरण परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवार 21 सप्टेबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा 340 क्युसेक व वाढीव 340 क्युसेक्स असा एकुण 680 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार आहे.

वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here