जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट (SFD) तर्फे गणेश घाट मेहरुन तलाव येथे निर्माल्य संकलन व 508 गणपती संकलन व विसर्जन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा मध्ये जल,जमीन,जंगल त्यांच्या संरक्षणासाठी स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा अंतर्गत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संरक्षण संबंधित कार्य चालू असते. पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले जातात.त्याच अनुषंगाने आनंत गणेश चतुर्थी च्या निमित्याने 508 गणपतीचे संकलन व विसर्जन करण्यात आले. तसेच 4 तास निर्माल्य संकलन दरम्यान तीन ट्रॅक्टर ट्रॉली शहरात व गणेश घाट या ठिकाणी निर्माल्य संकलन केले. यावेळी महानगर मंत्री रितेश महाजन , नगर मंत्री आकाश पाटील, मयूर माळी , नगर सहमत्री चैतन्य बोरसे, महानगर SFD संयोजक अभिषेक कोपुल , नगर SFD प्रमुख मनीष चव्हाण,सागर कोळी , आदेश पाटील ,नगर कलामांच प्रमुख संकेत वरुळकर , आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
