जळगाव प्रतिनिधी । ३० वर्षीय विवाहितेशी किरकोळ कारणावरून छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तांबापुरा येथील सुमैय्या परवीन अकबर शेख (वय-३०) यांचा विवाह २८ नोव्हेंबर २००८ रोजी चोपडा येथील अकबर शेख अहमद यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. त्यांना लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती अकबर शेख अहमद हा दारू पिऊन घरी येऊन मारहाण करून शिवीगाळ करू लागला. तसेच सासु ह्या मुलगा अकबर शेख याला बरे वाईट सांगून विवाहितेला मारहाण करायला सांगायचे तसेच घरातून निघून जा असे सांगत होते. त्याचप्रमाणे दोन्ही ननंदा यांनी विवाहितेला रंगा रूपावरून हिनवू लागले. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथे माहेरी निघून आल्या.
छळ होत असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अकबर शेख अहमद, सासू रईसाबी अ सुमारास तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून पतीसह दोन नंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे
