Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘नमो रथा’चे उद्घाटन
    जामनेर

    जामनेरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘नमो रथा’चे उद्घाटन

    saimat teamBy saimat teamSeptember 20, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    जामनेरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘नमो रथा’चे उद्घाटन
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । येथील राजमाता जिजाऊ चौकात आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नवभारत महोत्सवाच्या माध्यमातून ‘नमो रथा’चे उद्घाटन आ.गिरीश महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.

    यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, लोक कल्याणकारी राज्य आणण्याकरीता लोककल्याणकारी योजना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनहित संकल्पनेतून यशस्वी होताना दिसत आहे. म्हणून नमो रथाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत हा रथ पोहोचून सामान्य जनतेला योजनांची माहितीही मिळणार आहे. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.श्रीमती रक्षाताई खडसे नमो रथाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या. यावेळी संतोष सराफ यांनी गायलेल्या पोवाड्याच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या विविध कल्याणकारी योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

    यावेळी जामनेर नगर परिषदेच्या प्रथम महिला नगराध्यक्षा साधनाताई महाजन, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा नवभरात महोत्सवाच्या संयोजक भैरवीताई वाघ पलांडे यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहराध्यक्ष आतिश झाल्टे, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक अनिस शेख, दीपक तायडे, नगरसेवक श्रीराम महाजन, ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, जिल्हा संयोजक नवल पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण, डॉ.संजीव पाटील, सुहास पाटील, उल्हास पाटील, दत्तात्रय सोनवणे, रमेश नाईक, तालुका सरचिटणीस मयूर पाटील, सुभाष पवार, विजय शिरसाट, विकास वंजारी, वैभव नाईक, विश्‍वनाथ चव्हाण, शुभम माळी, संजय सूर्यवंशी, मनोज जंजाळ, विलास हिवराळे, जालमसिंग राजपूत, आकाश नेमाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.