धक्कादायक : लिव्ह इन रिलेशनशीपमधून झालेल्या १३ दिवसाच्या बाळाचा खून

0
77
बडतर्फ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून केला गोळीबार

पुणे, वृत्तसंस्था । लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या तरुणीला झालेल्या बाळाला आश्रमात सोडतो, असे सांगून घेऊन गेलेल्या १३ दिवसाच्या बाळाचा खून केल्याची घटना, तब्बल अडीच वर्षानी उघडकीस आली आहे. त्या प्रकरणी बाळाच्या बापाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

शुभम महेश भांडे, वय २२, रा. वडगावशेरी आणि योगेश सुरेश काळे, वय २३ रा.मांजरी अशा दोघा आरोपींना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम आणि पीडित महिला एका कंपनीत एकत्रित कामाला होते. त्या दोघांची सुरुवातीला मैत्री होती, नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालावधीनंतर दोघे एकत्रित राहू लागले. त्या दोघांच्या प्रेम संबंधातून २०१९ च्या सुमारास पीडित तरुणीने एका मुलाला जन्म दिला. त्या बाळाची तब्येत एकदम ठणठणीत होती.

पण आरोपी शुभम हा पीडित तरुणीला म्हणाला की, आपल्या दोघांच्या भविष्याचा विचारकरता बाळाला आश्रमात सोडून येतो. त्यानंतर रूग्णालयामधून डिस्चार्ज मिळताच,आरोपी शुभम बाळाला घेऊन गेला. आरोपी देखील काही वेळाने घरी आल्यावर पीडित महिलेला बाळाला आश्रमात सोडून आलो असल्याचे सांगितले. पीडित महिला वेळोवेळी आरोपी शुभम याच्याकडे बाळाबद्दल चौकशी करायची, त्यावर बाळ ठीक असल्याचे सांगत असायचा. महिलेने आपण बाळाला भेटूयात अशी मागणी अनेक वेळा आरोपीकडे केली. पण त्यावर त्याने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पीडित महिलेला बाळाचे बरे वाईट तर केले नसेल ना, असा संशय आला.

त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. त्यानुसार आरोपी शुभम याला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. ज्यावेळी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर बाळाला आश्रमात सोडतो असे सांगून मी बाळाला माझा मित्र योगेश काळे याच्या सोबत विमानतळ परिसरात असलेल्या दाट झाडीमध्ये घेऊन गेलो आणि तिथे टाकून दिले, अशी कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. तिथे बाळाच्या काही वस्तू देखील आढळून आल्या आहेत.त्या तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे मुंढवा पोलिसानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here