युवाशक्तीतर्फे काव्यरत्नावली चौकात गणेशमूर्ती संकलन केंद्र

0
54

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाला आळा घालण्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्थीला काव्यरत्नावली चौक येथे सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरगुती श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या संकलित मूर्तीचे एकत्रित विसर्जन केले जाणार आहे.

गेल्या वर्षी देखील संस्थेतर्फे काव्यरत्नावली चौकात राबवण्यात आला होता. यामध्ये जळगाव शहरातील २५०० वर घरगुती श्री गणेश मूर्ती संकलित करून, मेहरूण तलावात विधीवतपणे विसर्जन करण्यात आले होते. याच प्रकारे यावर्षी सुद्धा घरगुती गणेश मूर्तीं संकलन करून विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा पोलिस दल, जळगाव शहर महापालिका प्रशासन अाणि सार्वजनिक गणेशाेत्सव महामंडळ, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महापौर जयश्री महाजन, पोलिस निरीक्षक विजय शिंदे आदी मान्यवर देखील या केंद्रावर आपली घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी अर्पण करणार आहे.

विसर्जन आरती करण्यासाठी विशेष व्यवस्था
काव्यरत्नावली चाैकात विसर्जन आरती करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह युवाशक्तीचे ५० स्वयंसेवक, रामानंदनगर पोलिस स्टेशनचे १५ पोलिस बांधव, वाहतूक पोलिस शाखेचे ३ कर्मचारी, पूजा विधी करण्यासाठी १ ब्राह्मण, निर्माल्य संकलन करण्यासाठी महापालिकेचे ५ स्वच्छता दूत, ५ सजविलेले ट्रक, प्रसाद इत्यादी व्यवस्था करण्यात येणार आहे.

युवाशक्ती फाउंडेशनने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर चाैकाचाैकात ‘मास्क लावा, काेराेनाचे विघ्न टाळा’ असे अावाहन केले. गणपतीचा मुखवटा परिधान करून अप्रतिम घारगे, पवन खोंडे यांनी जानजागृती केली. विराज कावडीया, अमित जगताप, प्रीतम शिंदे, सयाजी जाधव, शिवम महाजन, यश भालशंकर, सिमरदीप सयाल यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here