इंजिनिअरिंगसाठी उद्यापासून सीईटी, जळगावातील सहा केंद्रांवर होणार परीक्षा

0
33

जळगाव, प्रतिनिधी । इंजिनिअरिंग (बीई), बी. फार्मसी अाणि कृषी तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा अनिवार्य असून, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ही सीईटी होणार असून, यंदा दोन टप्प्यांत सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होईल.

जी.एच. रायसोनी मॅनेजमेंट शिरसोलीरोड, गोदावरी फाउंडेशन ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, केसीई इंजिनिअरिंग कॉलेज, आयएमआर कॉलेज, एमजे कॉलेज या केंद्रांवर ही परीक्षा होईल. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी तसेच कृषी शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असते. दरवर्षी ही परीक्षा सामायिक कक्षातर्फे घेतली जाते. पहिल्या टप्प्यात २० ते २५ सप्टेंबर या दरम्यान (पीसीएम ग्रुप) तर तर दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर (पीसीबी ग्रुप) या पद्धतीने ही सीईटी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक परीक्षा कक्षाचे www.mahacet.org या संकेतस्थळास भेट देऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी, तसेच सूचनांचे अत्यंत बारकाईने वाचन करावे, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक ज्ञानदेव नाठे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच परीक्षा संबंधित सर्व सूचना विद्यार्थ्यांनी अवगत करून घ्याव्यात. जेणेकरून कोणाचीही एेनवेळी तारांबळ उडणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. परीक्षेच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा केंद्राबाबतची सर्व माहिती तपासून व खात्री करून घ्यावी, कोणत्याही अडचणींबाबत मार्गदर्शन घ्यावे, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here