Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»स्पीकर बंद करण्यावरून दोन गटात हाणामारी, विळ्याने मारण्यासह युवतीचा विनयभंग
    क्राईम

    स्पीकर बंद करण्यावरून दोन गटात हाणामारी, विळ्याने मारण्यासह युवतीचा विनयभंग

    saimat teamBy saimat teamSeptember 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । रामनगरात शुक्रवारी रात्री ११.१५ वाजता घरासमोर लावलेला स्पीकर बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये दगडफेक व हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच युवतीचा विनयभंग करण्यात आला आहे.

    रामनगरात शुक्रवारी गणपती उत्सवानिमित्त भंडारा आयोजित करण्यात आला होता. मनकर्णा शिंदे यांच्या दुकानात गणपती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. शुक्रवारी त्यांच्या ओळखीचे काही नागरिक आरती करण्यासाठी आले होते. या वेळी स्पीकरवर गाणे लावण्यात आलेले होते. बराच उशीर झाल्याने सौदागर खामकर यांनी स्पीकर बंद केला. तेव्हा रात्री ११.१५ वाजता रामनगरातील दुसऱ्या गल्लीतील कल्पनाबाई पाटील, शरद उर्फ आबा पाटील, सुरेखाबाई सोनवणे, ममताबाई टांेगळे (रा. रामनगर), विशाल पाटील, बायजाबाई पाटील, पूनमबाई खडसे (रा. हरिविठ्ठलनगर), राजेंद्र मराठे, चिन्या मराठे, भुऱ्या मराठे, मीनाबाई मराठे (रा. वाघनगर) यांनी खामकर यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने त्यांना चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेले त्यांचे आई, वडील, भाऊ व भावजयीलाही मारहाण करण्यात आली. भुऱ्याने चाकूने डाव्या हातावर मारून दुखापत केली. अशाेक खामकर यांच्या डाव्या हातावर राजेंद्र मराठे याने विळ्याने मारल्याने खरचटले आहे. इतरांनी दगडफेक करून खामकर कुटुंबीयांना जखमी केले. स्थानिक नागरिकांनी हा वाद सोडवला. याप्रकरणी वंदनाबाई खामकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गटातील युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौद्या याने विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दाद्या खामकर, बाजीराव खामकर, खंडू डिसले, वंदना खामकर, सोनी खामकर, त्रिशा, वैशाली यांनी मारहाण केली. दगडफेक केल्याची फिर्याद त्या युवतीने एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.

    सौद्या याने विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दाद्या खामकर, बाजीराव खामकर, खंडू डिसले, वंदना खामकर, सोनी खामकर, त्रिशा, वैशाली यांनी मारहाण केली. दगडफेक केल्याची फिर्याद त्या युवतीने एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.