Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभियंता दिन साजरा
    जळगाव

    सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभियंता दिन साजरा

    saimat teamBy saimat teamSeptember 16, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव प्रतिनिधी | अभियंता दिनाचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम खात्याच्या जळगाव विभागात सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांना अभिवादन करण्यात आले.

    सर मोक्षगुंडम विश्‍वसरैया यांच्या जयंतीला अर्थात १५ सप्टेंबर रोजी दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून आज सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते श्री. विश्‍वसरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

     

    याप्रसंगी कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत, उप कार्यकारी अभियंता एस. बी. पाटील, सहायक अभियंता श्रेणी- अ सुभाष राऊत, शाख अभियंता जितेंद्र महाजन, अभिषेक सूर्यवंशी, भूषण घुगे, भूपेंद्र रायसिंगे, राजहंस मॅडम, योगेश अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

     

    दरम्यान, याप्रसंगी सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती रूपा राऊळ-गिरासे यांनी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छापर संदेश जारी केला. यात त्यांनी म्हटले आहे की, अभियंता हा नवनिर्मितीचा जनक आहे. जनमाणसांचे जीवन सुकर होण्याकरीता अभियंता वेगवेगळ्या माध्यमातून कामे करून संकल्पना साकारत असतो. सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता हे रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स आदींसह इमारती बांधकाम करून भारता सारख्या विकसनशील राष्ट्राला आधुनिकतेकडे नेण्याचे मोलाचे कार्य करत आहेत असे नमूद करत त्यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.