भुसावळातील कुंटणखान्यावर धाड, बाजारपेठ पोलिसांची कारवाई

0
22

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज चौफुली परिसरात असणार्‍या वैतागवाडी भागात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या एका पथकाने रात्री उशीरा या भागात छापा टाकला. यात एक ग्राहक आढळून आला. संबंधीत कुंटनखाना चालवणारी महिला आणि त्या ग्राहकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आलेल्या एका महिलेची मुक्तता केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here