राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार

0
14

मुंबई : प्रतिनिधी

बीसीसीआयकडून परवानगी घेऊन आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सोमवारी 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्या येथे राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. भारतीय संघ बुधवार, 17 जानेवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर दोन दिवसांचा ब्रेक घेणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 20 जानेवारीला संघ हैदराबादमध्ये एकत्र येणार आहे.
16 सदस्यीय संघ हैदराबादमध्ये आल्यावर लगेचच सराव सुरु होईल मात्र क्रिकबझमधील वृत्तानुसार, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोहली 21 जानेवारी रोजी सराव सत्रानंतर अयोध्येला जाणार आहे. कोहली व अनुष्का शर्माच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका देण्यात आली होती तसेच, भारताचे माजी क्रिकेटपटू एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनाही प्रभू श्रीरामाच्या घरवापसीच्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी कोहली बंगळुरू येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सराव करताना दिसला होता. नवीन उल हकच्या गोलंदाजीवर मिड-ऑफला आउट होण्यापूर्वी स्टार फलंदाजाने पाच चौकारांसह 29 (16 ) अशी कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या खेळण्याच्या शैलीवर व स्ट्राइक रेटबाबत बोलताना अनेक माजी खेळाडूंनी मालिकेपूर्वी दावा केला होता की, आधुनिक 20 च्या निकषांना कोहलीचा खेळ साजेसा नाही.
मात्र, निवडकर्त्यांनी टी 20 विश्वचषक 2024 च्या आधी पुन्हा एकदा कोहली आणि कर्णधार रोहित शर्मावर विश्वास दाखवला. आता 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये सुरू होणाऱ्या मेगा इव्हेंटमध्ये ही जोडी संघाचा भाग होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here