आर प्रज्ञानंदने विश्वविजेत्या डिंग लिरेनला केले पराभूत

0
19

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा ग्रॅण्ड मास्टर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.सध्याचा विश्वविजेता असलेल्या डिंग लिरेनचा पराभव करत प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत त्याला पराभूत केले.या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. तो नंबर-1 भारतीय ग्रंँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.
या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद फाईडच्या लाइव्ह रँकिंगमध्ये 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे 2748.3 गुण आहेत तर विश्वनाथन आनंद 12 व्या क्रमांकावर आहे. आनंदचे 2748.0 गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 2016 मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या 10 वर्षे 10 महिन्यांचा असताना प्रज्ञानंदने ही कामगिरी केली होती. 2017 मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. यानंतर 2018 मध्येही त्याने यश संपादन केले. प्रज्ञानंद चेन्नई, तामिळनाडू येथील आहेत. त्याचा जन्म 2005 मध्ये झाला होता. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रज्ञानंंदाने अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनालाही पराभूत केले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी जिंकून त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्ञानंदने उपांत्य फेरीच्या टायब्रेकमध्ये कारुआनाचा पराभव केला. बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून प्रज्ञानंदाचा पराभव झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here