जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील राज्य परिवहन महामंडळाने २०१९ मध्ये भरती करण्यात आली होती. यात चालक आणि वाहक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत यापुर्वी वेळोवेळी आंदोलन आणि निवेदन देण्यात आले होते. परंतू अद्यापपर्यंत वाहक आणि चालकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. येत्या आठ दिवसांत नियुक्तीपत्र मिळावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करत आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव राज्य परिवहन मंडळाच्या सन-२०१९ मध्ये वाहन चालक व वाहक यांची भरती राबवण्यात आली होती. परंतु पात्र झालेल्या चालक आणि वाहक या उमेदवारांना अद्यापपर्यंत नियुक्तीपत्र दिले नाही. याबाबत उमेदवारांनी वेळोवेळी आंदोलन व निवेदन दिले होते. चालक व वाहक अंतिम वाहन चालन चाचणी पास झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून महामंडळाचे विभागात जाऊन नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात मागणी केली आहे. आधीच कोरोनामुळे उमेदवारांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खराब झाली आहे. त्यातच राज्य परिवहन मंडळ हे पिळवणूक करत आहे. उमेदवारांची मानसिक स्थिती खूपच खराब होत चालले आह. कोणत्याही क्षणी नैराश्याने आत्महत्या करण्याची शक्यता बळावली आहे. या दरम्यान जळगाव आगारातील कर्मचारी मनोज चौधरी आणि धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कमलेश बेडसे यांनी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे आत्महत्या केली होती. चालक तथा वाहक पदाची अंतिम चालन चाचणी पास होऊन आज बरेच महिने झालेले आहे. तरी जळगाव विभाग कुठलाही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. यासंदर्भात वेळोवेळी फोन करून फक्त उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने संतप्त झालेल्या वाहन चालक व वाहक यांनी आज मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी शहरातील नवीन बसस्थानकपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. तातडीने येत्या ८ दिवसात पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी चेतन पाटील, निलेश पाटील, गौतम लोखंडे, अमोल मोरे, सागर लहासे, सचिन आस्कर, चंद्रशेखर गुजर, सिद्धार्थ भालेराव यांच्यासह पात्र उमेदवार उपस्थित होते.