हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळ्यांची नाही, विकास प्रकल्पांची चर्चा

0
20

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या शिवडी ,न्हावा, शेवा अटल सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू म्हणून प्रचिती असलेल्या या सेतूबद्दल नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले. तसेच, अटल सेतूबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात बांधलेल्या वांद्रे-वरळी सीलिंकशी याची तुलना केली आणि काँग्रेसवरही टीकास्र डागले.
आज जगातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला. हे आमच्या संकल्पातील प्रमाण आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धीचे परिमाण आहे. २४ डिसेंबर २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटले होतं की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा नमन करताना, मुंब्रा देवी, सिद्धीविनायकाला प्रणाम करून अटल सेतू मुंबईकरांसाठी समर्पित करत आहे. करोनाच्या महासंकटातही मुंबई ट्रान्स हार्बरचं काम पूर्ण होणं ही मोठी गोष्ट आहे. भूमिपूजन, लोकार्पण एका दिवसाच्या कार्यक्रमापुरतं नसतं. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प भारताच्या नवनिर्माणाचं माध्यम आहे. एका-एका विटातून इमारत बनते. तसेच अशा प्रत्येक प्रकल्पातून भव्य भारताची इमारत बनेल, असेही मोदी म्हणाले.

आता प्रकल्पांची चर्चा होते
गेल्या १० वर्षांत भारत बदलला आहे. याची चर्चा खूप होते. बदलत्या भारताचा फोटो स्वच्छ होतो, जेव्हा १० वर्षांच्या आधीचा भारत आठवतो. हजारो लाखो रुपयांच्या महाघोटाळ्यांची चर्चा असायची. आता हजारो कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याच्या चर्चा असतात. सुशासनाचा हा संकल्प देशभर दिसत आहे. अटल टनल आणि चेनाब सारख्या ब्रिजची चर्चा होते. एकामागोएक बनवणाऱ्या महामार्गांची चर्चा होते. इस्टर्न आणि वेस्टर्न, वेस्ट कॉरिडोर रेल्वेचे प्रतिमा बदलणारे आहे. वंदे भारत, नमो भारत, अमृत भारताचे ट्रेन सामान्य माणसांचं जीवन सुकर करत आहेत. आज प्रत्येक देशातील प्रत्येक कोनात नव्या एअरपोर्टचे उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातही अनेक मेगा प्रकल्प पूर्ण होत आहेत”, असंही मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here