शालीनी ठाकरे यांनी घेतली दिलीप वळसे पाटील यांची भेट 

0
19

मुंबई – प्रतिनिधी

मुंबईतील साकी नाका परिसरातील घटना  बरोबरच  राज्यातील अन्य भागतही महिलेंवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत . अश्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणे हे महत्वाचे असल्याचे मत मनसेचे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले आहे . त्यांनी मंत्रालयात आज राज्यच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली .

राज्यात पोलिसांचा धाक कोणालाही राहिला नाही . 17 वर्षाचा मुलगा गॅंग रेप मध्ये आरोपी होतो आणि तरी ही त्याचा जामीन होतो अश्यात पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक राहणार तरी कसा त्यासाठी  शक्ती कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली . यावेळी गृह मंत्री यांनी शक्ती कायदा हा येत्या हिवाळी अधीवेशनात  संमत करू, तसेच महिलांच्या बाबतीत सरकार गंभीर असून या पुढे असे प्रकार घडू नये या साठी पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्याचे ही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले .   अनेक प्रकरणात आरोपी हे परप्रांतीय असल्याच्या मुख्यमंत्री च्या वक्तव्या ने राजकारण होत आहे असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की सध्या महिलांवर अत्याचार होत आहेत . त्यामध्ये अधिक आरोपी परप्रांतीय आहेत त्यामुळे या येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवणे गरजे चे आहे ही मागणी राज ठाकरे यांनी केली होती मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली . मात्र काही लोकांना त्यांची वोट बॅंकेची काळजी वाटत आहे मात्र राज ठाकरे हे फक्त महाराष्ट्राच्या हिताचे बोलतात .  असे ही शालिनी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here