जेष्ठ वास्तु विशारद शिरीष बर्वे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

0
39

जळगाव : प्रतिनिधी

परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे जेष्ठ वास्तूविशारद शिरीष बर्वे यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्र विषयात कार्य करणारे शिरीष बर्वे हे उत्तम वास्तू विशारद म्हणून ओळखले जातात. त्यांना यापूर्वी यंग आर्किटेक्ट ऑफ एशिया या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. कल्पकता आणि नाविन्यपूर्णता यांच्या बळावर त्यांनी निर्माण केलेल्या अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. पण या सोबतच जळगाव शहरातून जाणाऱ्या हायवेचे चौपदरीकरण व्हावे यासाठी न्यायलयीन लढाई लढली होती. यासोबतच पर्यावरणाच्या क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे.
सोबतच गेल्या अनेक वर्षांमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीत देखील त्यांचे योगदान राहिलेले आहे. आजवरच्या त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेतील उपक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आलं. कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या आयोजन प्रसंगी मध्यंतरात ज्येष्ठ अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या हस्ते शिरीष बर्वे आणि माधुरी बर्वे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, ज्योती जैन, अनिल कांकरिया, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, अनिश शहा, नहीचे अधिकारी शिवाजी पवार, डॉ. शेखर रायसोनी आर.सी.बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील, रोहित निकम या मान्यवरांच्यासोबत कुर्रर्रर्रर्र नाटकातील अभिनेते पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव आणि मयुरा रानडे हे उपस्थित होते. मानपत्राचे वाचन हर्षल पाटील यांनी केले. या नाटकासाठी जळगावशहरातील रसिक प्रेक्षक व ए.टी.झांबरे विद्यालय, विवेकानंद शाळा, कन्या छात्रालयाच्या विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here