सत्ता गमावलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसने थेट मंत्र्याला पराभवाचे पाजले पाणी

0
20

जयपूर : वृत्तसंस्था
भाजपने काँग्रेसला पराभूत करत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवलें. सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील करणपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंग कुन्नर यांनी भाजपचे उमेदवार आणि कृषीमंत्री सुरेंद्रपाल सिंग यांचा पराभव केला आहे. कांँग्रेसचे रुपिंदर सिंग यांनी ११ हजार२८३ मतांनी विजय मिळवला. त्यांना ९४ हजार ९५० मते मिळाली.
कांँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या निवडणुकीतील विजयानंतर रुपिंदर सिंग कुन्नर यांचे अभिनंदन केले आहे.गेहलोत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,करणपूरच्या जनतेने भाजपच्या अभिमानाचा पराभव केला आहे. इथल्या जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.
भाजपने निवडणुकीत उमेदवार असलेल्या व्यक्तीला मंत्री करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला पण जनतेने धडा शिकवला,असे गेहलोत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here