जिल्ह्यातील ८ पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार जाहीर

0
21

जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजीच्या दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. व्ही.एल.माहेश्वरी राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रो. एस.टी. इंगळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर,पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रविण सपकाळे हे उपस्थित राहणार आहेत.
या दर्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया व छायाचित्रकार अशा एकूण आठ जणांना दर्पणकार पुरस्कार जाहीर आले आहेत. यात –

प्रिंट मीडिया :
विलास बारी(लोकमत),
प्रदीप राजपूत(दिव्यमराठी),
देविदास वाणी(सकाळ),
राजेंद्र पाटील(पुण्यनगरी),
इलेक्ट्रॉनिक मीडिया :
चंद्रशेखर नेवे(एबीपी माझा),
सचिन गोसावी(दूरदर्शन),

डिजिटल मीडिया :
संतोष सोनवणे(मॅक्स महाराष्ट्र),
छायाचित्रकार:
आबा मकासरे (छायाचित्रकार)
तरी जिल्ह्यातील पत्रकार बांधव व पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी,नागरिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन माध्यमशास्र प्रशाळेचे डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, ऍड. सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख
पत्रकार संघांचे खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा,उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे जिल्हाध्यक्ष शरद कुलकर्णी,ग्रामीण जिल्हाध्यक्ष,
नागराज पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष, संतोष नवले, महानगराध्यक्ष कमलेश देवरे तसेच माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here