अखेर रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

0
19

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. आता फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांची रजनीश सेठ यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नवीन डीजीपी बनल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली. रजनीश सेठ, १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी या पदासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांनी अर्ज केले होते मात्र, निवड समितीचे प्रमुख मनोज सौनिक यांनी रजनीश सेठची निवड केली.त्यामुळे रजनीश सेठ यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here