पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातदेखील याचा फैलाव होताना दिसत आहे.अशातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.आता राज्याच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्याचे पहायला मिळत आहे.त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात यावर माहिती देत राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत पण अपेक्षा करूया की, याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. गेल्या काही वर्षात लोकांना अनुभव आला आहे, जनतेला याचा त्रास झाला आहे. त्यामुळे आता कसं वागायचं याबाबत लोकांना माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणी नाताळ असो वा नवीन वर्ष, लोकांनी काळजी घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एकाच दिवसात ५० रुग्ण
महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे ५० रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ९.१ व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात २१ डिसेंबरपर्यंत .१ व्हेरिएंटचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात जे नवे रुग्ण सापडले आहेत ज्यामध्ये जवळपास ५ पैकी १ रुग्ण नव्या व्हेरिएंट .१ चे आहे. अशावेळी महाराष्ट्र नव्या व्हेरिएंटचे सुपर स्प्रेडर तर ठरत नाही ना?, असा सवाल विचारला जातोय.
राज्यात जारी झाला अलर्ट
दरम्यान, .१ चे व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य आवश्यक उपकरणांची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना व्हायरसच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सोिन्सिंगसाठी सर्व नमुने पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.