घाटकोपर जॉली जिमखान्याच्यावतीने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

0
73

जळगाव : प्रतिनिधी
घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने १३ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान घाटकोपर जॉली जिमखाना, फातिमा हायस्कूल समोर, विद्याविहार (पश्चिम), येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांसाठी होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांच्या वतीने तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtra carromassociation. com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे जिल्हा कॅरम असोसिएशनने नावे देण्याची अंतिम मुदत २८ डिसेंबर २०२३ असून यापूर्वी खेळाडूंनी आपल्या क्लबमार्फत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्हा कॅरम असोसिएशनकडे आपली नावे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क करावा,असे आवाहन मानद सरचिटणीस अरुण केदार यांनी केले आहे.या स्पर्धेसंदर्भात जळगाव कॅरम असो.चे मंजूर खान यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here