जळगाव : प्रतिनिधी
शहरात सर्वसुविधायुक्त एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा स्व.सौ.वनिता लाठी यांचा मानस होता.हा मानस प्रत्यक्षात साकारण्यासाठी ॲड. नारायण लाठी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शनेश्वर हेल्थकेअर प्रा. लि.जळगाव यांच्या माध्यमातून वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी रिंगरोडवर करण्यात आली आहे. आज रविवार दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता या मल्टीस्पेशालिटी
हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे.
वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व विकारांवरील उपचारांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व चाचण्या उपलब्ध होणार आहेत. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान शनेश्वर हेल्थकेअर प्रा. लि.चे अध्यक्ष ॲड. नारायण लाठी हे भूषविणार आहे तर उद्घाटक पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील, विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम,आ.राजूमामा भोळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन हे असणार आहेत. याप्रसंगी अतिथी म्हणून खा. उन्मेष पाटील, खा. रक्षाताई खडसे,कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, आ. लता सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. संजय सावकारे आदींची उपस्थिती राहील. या समारंभास नागरिकांना उपस्थितीचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण सोमाणी, संचालिका डॉ. पूजा सोमाणी, संचालिका डॉ. मयुरी लाठी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.