जळगाव ः प्रतिनिधी
विविध सामाजिक उपक्रम राबवणार्या समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रविवार रोजी उनपदेव, मंगरुळ परिसरातील आदिवासी ऊसतोड कामगार वस्त्यांवर साड्या, पातळं, स्वेटर, दप्तर, बिस्किटचे पुडे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे.
सहकार्य – उपक्रमासाठी भगीरथ शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनिता मधुकर पाटील, चंद्रशेखर पिंपरकर, सुदाम निकम, आशिष पाटील, रेखा म्हात्रे, शालिनी सैंदाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, पत्रकार शरद भालेराव, संस्थेचे अध्यक्ष आर.डी. कोळी, कवी गोविंद पाटील, दिपेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.