तिसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यातच साई सुदर्शनला मिळाले खास गिफ्ट

0
66

पर्ल : वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेत साई सुदर्शन, रिंकू सिंग आणि रजत पाटीदार या ३ खेळाडूंनी पदार्पण केले. यापैकी साई सुदर्शनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वांनाच प्रभावित केले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये डावखुऱ्या फलंदाजाने अर्धशतके झळकावून लोकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर तिसऱ्या सामन्यात बॅटने तो विशेष काही करू शकला नाही, पण मैदानात अप्रतिम झेल घेऊन सर्वांनाच चकित केले. डायव्हिंग करताना त्याने अतिशय अप्रतिम झेल घेतला.
साई सुदर्शनला त्याच्या या शानदार झेलसाठी ‘इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांनी बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, आपण या मालिकेत एकूण १२ झेल घेतले, त्यापैकी ६ केएल राहुलचे होते मात्र, त्यानंतरही सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक साई सुदर्शनला देण्यात आले.
ते म्हणाले की, केएल राहुल आणि साई सुदर्शन यांच्यात क्षेत्ररक्षण पदक निश्चित करणे कठीण होते. तेव्हा प्रशिक्षकाने सांगितले की, राहुलने त्यांना सांगितले की माझे झेल फार कठीण नव्हते आणि ते थेट हातात येत होते, त्यामुळे हा क्षेत्ररक्षण पुरस्कार प्रशिक्षकाने साईला प्रदान केला.
साईच्या झेलबद्दल बोलायचे झाले तर ३३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेश खानच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेनचा झेल त्याने घेतला. सुदर्शनने फॉरवर्ड डायव्हिंग करून हा अवघड झेल घेतला, ही दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पाचवी विकेट आणि टीम इंडियासाठी महत्त्वाची विकेट होती कारण यानंतर टीम दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला.
मालिका विजय
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली पण दुसऱ्या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघाने तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here