Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»विरोधकांचा निषेध करण्यासाठी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांचे उभे राहून कामकाज
    राष्ट्रीय

    विरोधकांचा निषेध करण्यासाठी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांचे उभे राहून कामकाज

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनकड यांची नक्कल करून निषेध आंदोलन केले होते. ही नक्कल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या मोबाइलवर चित्रीकरण करताना दिसले. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले.
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून विरोधकांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्यसभेचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सर्व सत्ताधारी खासदार उभे राहून काम करणार असल्याचा ठराव मांडला.

    काय म्हणाले प्रल्हाद जोशी?
    “काल आम्ही पाहिले की, सभापतींच्या संविधान पदाचा अपमान झाला. लोकसभेचे सदस्य राहुल गांधी यांनी आपली नक्कल होत असताना त्याचे चित्रीकरण केले. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तिला अशाप्रकारे कलंकित करणे योग्य नाही. मी २० वर्षांपासून संसदेत सदस्य आहे. या काळात पहिल्यांदाच संसदेचे सदस्य इतक्या खालच्या पातळीवर गेल्याचे मी पाहत आहे. या प्रकाराची मी घोर निंदा करतो”, अशी भूमिका प्रल्हाद जोशी यांनी मांडली.
    ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिब घरातून येतात, ते ओबीसी समाजातून येतात म्हणून त्यांचा अवमान केला गेला. त्यानंतर आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचाही अपमान करण्यात आला. आता एका शेतकरी कुटुंबातून उपराष्ट्रपती झालेल्या सभापतींचा संसदेत अवमान करण्यात आला. पहिल्यांदाच जाट समाजाचा एक नेता उपराष्ट्रपतीपदावर पोहोचला. या पदावरील व्यक्तीचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही उपराष्ट्रपतींचा अवमान सहन करणार नाही. यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रश्नोत्तराच्या तासात जागेवर उभे राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही आपला सन्मान आणि विरोधकांचा निषेध करत आहोत.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.