Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत
    मुंबई

    जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर वाढलेल्या पोटावरून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनीही अजित पवारांविरोधात खोचक टोलेबाजी केली. “अजितदादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला, तेव्हा मला वाटले की, तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक ॲब्ज’ केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो,” असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.
    जितेंद्र आव्हाडांच्या टोलेबाजीला अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. राखी सावंत नेहमी काहीतरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा प्रयत्न करते. तसेच जितेंद्र आव्हाड करत असतात, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
    अजित पवारांवरील टीकेला उत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले, “जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. मी त्यांना राखी सावंत का म्हणतोय? कारण ती चित्रपटसृष्टीत असली तरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच जितेंद्र आव्हाड आहेत. नेहमीच प्रसिद्धीझोतात येण्यासाठी काहीतरी वादंग निर्माण करणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवणं हा त्यांचा व्यवसाय आहे.”
    “जितेंद्र आव्हाड कधीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत.ते कधीही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत नाहीत. ते कधीही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाहीत. ते फक्त विचारधारेच्या गोष्टी करतात. विचारधारेच्या गोष्टी करून ते भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याच्या पत्रावर सहीही करतात आणि संधी बघून ते विरोधही करतात, असे जितेंद्र आव्हाड आहेत”, अशा शब्दात सूरज चव्हाणांनी टीकास्र सोडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.