Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मनोरंजन»रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ : आकडा ५०० कोटींजवळ
    मनोरंजन

    रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ : आकडा ५०० कोटींजवळ

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 6, 2023Updated:December 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ॲनिमल सिनेमा चित्रपटगृहात तुफान कमाई करत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. या सिनेमाला सेंसर बोर्डकडून अडल्ट सर्टिफिकेट मिळालं असतानाही भारतासह जगभरात सिनेमा बंपर कमाई करत आहे. सिनेमाने ६३.८ कोटींची ओपनिंग केली. त्यानंतर सिनेमाची कमाई सतत वाढतेच आहे. ॲनिमल सिनेमाने मंगळवारी हैराण करणारी कमाई केली आहे.
    मीडिया रिपोर्टनुसार, ॲनिमल आणि जवान सिनेमाची तुलना केल्यास रणबीरचा सिनेमा वरचढ ठरला आहे. ॲनिमल सिनेमाने यावर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण आणि गदर २ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. ॲनिमल सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला होता, तर जवान सिनेमा गुरुवारी प्रदर्शित झाला होता.
    ॲनिमल सिनेमाने मंगळवारी, सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पाचव्या दिवशी ३८.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जवान सिनेमाने मंगळवारी, अर्थात सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या सहाव्या दिवशी २६ कोटींची कमाई केली होती.आता ॲनिमल सिनेमा ३०० कोटींच्या जवळपास पोहोचताना दिसत आहे. या सिनेमाने पाच दिवसांत देशभरात २८३.७४ कोटींची कमाई केली आहे.
    ॲनिमल सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पाच दिवसांत ५०० कोटींच्या जवळपास पोहोचताना दिसत आहे.या सिनेमाने चार दिवसांत वर्ल्डवाइड ४२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.जवळपास १०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला ॲनिमल सिनेमा देशभरात ४ हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.जवान सिनेमाला त्याहून अधिक स्क्रिन्स मिळाल्या होत्या. ॲनिमल सिनेमात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा ३ तास २१ मिनिटांचा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    Guwahati Crimeगुवाहाटीत मध्यरात्रीच्या भीषण अपघातात अभिनेता आशिष विद्यार्थी आणि पत्नी गंभीर जखमी

    January 3, 2026

    Annual Function Of BUN Raisoni School : बीयूएन रायसोनी स्कुलच्या वार्षिक सोहळ्यात सर्वांगीण प्रगतीचा उत्सव

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.