Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं प्रत्येक जातीत
    राज्य

    पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं प्रत्येक जातीत

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 1, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कर्जत : वृत्तसंस्था

    राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा समाजाने कुणबी जात प्रमाणपत्र आणि आरक्षणाची मागणी लावून धरल्याने ओबीसी समाजाने त्याला कठोर विरोध केला आहे. यामुळे मराठा समाजातील नेते आणि ओबीसी समाजातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात तर शाब्दिक युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे समाजातील वातावरण गढूळ होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांचाही उल्लेख न करता सज्जड दम भरला आहे. कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
    अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो, तो असलाच पाहिजे. परंतु, पहिल्यांदा आपला देश, आपला भारत, आपला महाराष्ट्र आणि आपलं राज्य असायला पाहिजे. शाळा-महाविद्यालयाचा आपल्याला अभिमान असतो. त्यामुळे जातीचा-धर्माचाही अभिमान असायला हवा. आपल्या जाती-धर्माचा अभिमान जपत असताना सर्वांना विनंती आहे की, इतर समाजाबद्दल, जाती-धर्माबद्दल द्वेष किंवा आकस मनामध्ये ठेवू नका. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या बोलण्यातून, वर्तवणुकीतून अनवधानानेही असे प्रकार घडत नाहीत ना याची काळजी घ्यावी. एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणात काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचे मागासलेपण पुन्हा तपासणे आवश्यक असतं, असे अजित पवार म्हणाले.

    हाच का स्वप्नातला महाराष्ट्र?
    “आज अठरापगड जातीत भांडणे होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुलेंचा आणि शाहू महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हाच आहे का,असा प्रश्न पडतो, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

    मराठा ही महाराष्ट्राची ओळख
    “रविंद्रनाथ टागोर यांनी देशाचे राष्ट्रगीत लिहिताना काय लिहिलंय की, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा पंजाब होतं, सिंधही तेव्हाच होतं. गुजरातही राज्य आहे आता. पण राष्ट्रगीतात महाराष्ट्र असे म्हटलेले नाही. हा देश पूर्वीपासून महाराष्ट्राला मराठा म्हणून ओळखतो. मराठा ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची निगडीत अशी ओळख आहे. अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले असं म्हटलं जायचं, तेव्हा सर्व जाती मराठ्यांमध्ये समाविष्ट असायच्या. सेनापती बापट उगाच म्हणाले नाहीत की, ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले. मराठ्याविना राष्ट्रगाडा न चले.’ अवघ्या देशात पहिलं आरक्षण देणारं छत्रपती शाहू महाराज हे आपल्याच कोल्हापुरचे. परंतु, आरक्षणाच्यानिमित्ताने त्यांचे फोटोही लावले जात नाहीत”, असेही पवार म्हणाले.

    मराठा ही भावकी होती
    “आपली पोरं शिकली पाहिजेत, आयुष्याच्या लढाईत पुढे गेली पाहिजेत असा प्रत्येक आईबाबाचा विचार असतो. पण दुसऱ्याचं पोर शिकतंय याचा द्व्‌ेष आपण कधीपासून करायला लागलो आहोत? हा महाराष्ट्राचा विचार नाही. पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं महाराष्ट्रातील प्रत्येक जातीत सापडतील.मराठा ही भावकी होती. शेती करणारा कुणबी होता. कोणत्याही जातीचा असू द्या, आधीच्या काळात महापुरुषांमध्येही मतभेद होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यातही मतभेद होते. परंतु, टिळकांना न्यायालयात मदत करणारे महात्मा ज्योतिबा फुले याच मातीतले होते, हे विसरून चालणार नाही. यांच्याकडून आपण काही शिकणार आहोत की नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    अजित पवार हे होऊ देणार नाही
    “आज महाराष्ट्रात कोणी राजकारणासाठी जाती-जातीत भांडण लावून दंगली घडवून आणत असतील तर मी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हा अजित पवार हे होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी हे होऊ देणार नाही”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025

    IMD weather update : “महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! आयएमडीचा 14 जिल्ह्यांना तातडीचा येलो अलर्ट”

    December 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.