धक्कादायक : दवाखान्यात जाण्याच्या कारणावरून मुलाने केला बापाचा खून

0
30

जळगाव, प्रतिनिधी । दवाखान्यात जाण्याच्या कारणावरून मुलाने भरदिवसा मुख्य रस्त्यावर बापाचा खून केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या कांताई नेत्रालयजवळ भरदिवसा मुख्य रस्त्यावर दवाखान्यात जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन मुलांनी आपल्या बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की, निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाजवळ प्रेमसिंग राठोड हे पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज सकाळी त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी याला नकार दिला. यावर घरात वाद झाला.

या वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून आपल्या मुलांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत दोन्ही मुलांनी त्यांचा चाकूने वडिलांवर वार करून त्यांना संपविले. या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपक आणि गोपाळ या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी तालुका पोलीस स्थानक गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून त्यामुळे रहदारीला देखील अडथळा निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here