Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार;ते देखील आहे की नाही?
    मुंबई

    महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार;ते देखील आहे की नाही?

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत.त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी सरकारवर टीकास्र डागले आहे. राज्यात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला असल्याचे ते म्हणाले.आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली.
    उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे पण हे सरकार तरी आहे की नाही,असा प्रश्न पडला आहे. प्रदुषण पाहिल्यानंतर आपल्या असंवैधानिक सरकारने जाहीर केले होते की मुंबईतील रस्ते धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडे सगळं कृत्रिमच आहे. पण तो कृत्रिम पाऊस पाडता आला नाही. सुदैवाने मुंबईत पाऊस पडला आणि प्रदुषण कमी झाले असावे.
    तेलंगणात जाऊन

    कोणत्या भाषेत बोलणार?
    “परंतु, त्याचवेळेला मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी येतात.त्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत माहिती मागवली पाहिजे.आज जे मुख्यमंत्री स्वतःचे घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळतात. तेलंगणात जाऊन ते कोणत्या भाषेत बोलणार? सुरत गुवाहाटीचा चोरटेप्रकार त्या लोकांना सांगणार आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.

    या राज्याचा मायबाप कोण?
    “हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. दुसरे दोन हाल्फ कुठे आहेत माहित नाहीत. मग शेवटी या राज्याचा मायबाय कोण आहे?आपल्या कृषीमंत्र्यांनी जाहीर केले होते की, दिवाळीपूर्वी पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर नंतर ते दिसले नाहीत. दिवाळीत फटाक्यांचा आवाज ऐकू आला पण मुंडेंचा आवाज ऐकू आला नाही.
    पण शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली का? मिळाली असेल तर कितीजणांना मिळाली? जी काही माहिती येत आहे त्यानुसार, काहींना २० रुपयांचा चेक मिळाला. ही तर शेतकऱ्यांची थट्टा झाली”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

    मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित शेती
    उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, टीका केली की हे लोक लगेच गळे काढतात की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण यांची पंचताराांकित शेती आहे. ते तिथे हेलिकॉप्टरने पोहोचतात.अशी पंचतारांकित शेती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येऊदेत. पण आपला गरीब बिचारा शेतकरी त्याची पायवाट तुडवत शेतीत जातो. शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकऱ्याची चिंता का वाटत नाही? असाही सवाल त्यांनी
    विचारला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.