मुक्ताईनगरात सायकल रॅली

0
21

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी ११ सप्टेंबरला ऋषिपंचमीचे औचित्य साधून सकाळी ६ वाजता मुक्ताईनगर विश्रामगृह ते माळेगाव परिसरातील महाकाली मंदिरापर्यंत महासायकल रॅलीचे काढण्यात आली. त्यात सोसायटीच्या सदस्यांनी आरोग्यविषयक जनजागृती केली.

सिव्हील सोसायटीचे सदस्य वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर काम करतात. आता आरोग्य निरोगी, प्रदूषणमुक्तीसाठी सायकलिंग का महत्वाची आहे पटवून देण्यासाठी सदस्यांनी शनिवारी सायकल रॅली काढली. त्यात नियमित सायकलिंग केल्याने शरीराला कसा फायदा होतो? हे पटवून देत इंधन बचतीसाठी शक्य तिथे प्रवासाचे साधन म्हणून सायकलीचा वापर करावा. यामुळे प्रदूषणाची समस्या काहीशी कमी करता येईल, असे आवाहन केले. तसेच सालाबादाप्रमाणे यंदा देखील सोसायटीचे सदस्य गणपती मूर्ती व निर्माल्य संकलन करणार असल्याचे सांगण्यात आले. नदीचे पावित्र्य राखण्यासाठी सोसायटी दरवर्षी हा उपक्रम मुक्ताईनगर तालुक्यात राबवत आहे. १५ ऑगस्टला सिव्हिल सोसायटीने ७५ वा स्वातंत्र्यदिन वृक्षरोपणातून साजरा केला.या प्रसंगी सदस्यांनी ७५ झाडे लावली. त्या वृक्षांचे संगोपनाचीही जबाबदारी सिव्हिल सोसायटी पार पाडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here