लग्नाचे आमिष देऊन विवाहितेवर अत्याचार, एकावर गुन्हा

0
43
वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनी येथील माहेर असलेली एक महिला पतीसोबत वाद झाल्याने माहेरी आली हाेती. गैरफायदा घेऊन लग्नाचे अामिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. तत्पुर्वी संबधीत महिलेकडून २ लाख २५ हजार रुपये लाटल्याचा प्रकार घडल्याने पिडीतेच्या तक्रारीवरुन शनिवारी एमआयडीसी पोलिसांत कमलेश ऊर्फ बंटी जयपाल मखिजा रा. सिंधी कॉलनी जळगाव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला.

३१ वर्षीय विवाहीतेचे दुसरे लग्न झाले असून ती, विदर्भात पती व मुलासह वास्तव्यास आहे. मे महिन्यात पतीसोबत वाद झाल्याने विवाहीता मुलाला घेऊन घरुन निघून आली होती. आजीकडे वास्तव्यास असताना मैत्रिणीचा भाऊ कमलेश ऊर्फ बंटी जयपाल मखिजा याच्याची तिची ओळख झाली. त्याने पतीसोबत घटस्फोट घेऊन आपल्याशी लग्न करण्याचा तगादा लावला होता. लग्नाचे आमीष देत पिडीतेवर बळजबरी करुन तिला लग्नाची ग्वाही दिली होती. त्यासह पती सोबत असलेले वाद आणि पोलिसांतील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वेळोवेळी पैसे उकळून २ लाख २५ हजारांचा गंडा घातला. पैसे उकळूनही काम झाले नाही म्हणून पैशांची मागणी केल्यावर वाद घालून शिवीगाळ दमदाटी करुन हकलून लावले. पिडीतेने या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कमलेश ऊर्फ बंटी जयपाल मखिजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here